ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुधनीत विविध सामाजिक संघटनातर्फे अभिवादन

गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१४: दुधनी येथील शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने आद्य समाज सुधारक, महानसंत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८९०वी जयंती यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली.महात्मा बसवेश्वर हे क्रांतिकारी संत होते.

दुधनीत दर वर्षी अक्षय तृतीय आणि महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने बैल जोड्यांना पिवळ्या रंगाने रंगवून, गोंड्या- बाशिंग बांधून, नैवेद्य देऊन त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणूक काढली जाते. या बैलजोड्यांच्या मिरवणुकीत शहरातील अनेक शेतकरी आपल्या बैल जोड्यांसमवेत हजेरी लावतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व उत्सवांवर बंदी घातली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी बसव जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

दुधनीत महात्मा बसवेश्वररांना मानणारा मोठा भक्तगण आहे. महात्मा बसवेश्वरांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ठ रुढी, जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, कुळभेद विरुद्ध लढा दिला. यामुळे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

● कृषी उत्पन्न बाजार समिती

येथील शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत जगज्योति महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त बाजार समितीत बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक शंकरजी म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सचिव एस. एस. स्वामी, लेखपाल एम. सी. कोंपा, चंद्रकांत कामजे, रतीश कोटनूर, सुनील आळंद यांच्यासह बाजार समितीतील इतर कर्मचारी उपस्थित होते.

● श्री बसव प्रतिष्ठान

येथील श्री बसव प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर मंदिरात बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश सावळसुर व हणमंत अल्लापुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लिनाथ येगदी, इरय्या पुराणिक, सुगय्या बाहेरमठ, अंबण्णा निंबाळ, विश्वनाथ गंगावती, जगदीश माशाळ,दौलत हौदे, सुनील मिरकल, शांतलिंग परमशेट्टी, शिवानंद हौदे,सागर अमाणे, शिवकुमार मगी, कुमार काळजे, गोलू ठक्का,आकाश हौदे,गुरूशांत वडियार आणि इतर सदस्य उपस्थित होते.

● बसव भारत संघटना

दुधनी येथील बसव भारत संघटनेच्यावतीने अक्षयतृतीया आणि आद्य समाज सुधारक महानसंत महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त येथील विरक्त मठात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गुरुशांत उप्पीन, गुरुशांत ढंगे, उमेश धल्लू, गुरुशांत हबशी, बाबा टक्कळकी, हणमंत गुडोडगी, मल्लिनाथ मठपती, गुरुशांत मठपती, गुरुशांत धल्लू, मल्लिनाथ धल्लू आणि इतर सदस्य उपस्थित होते.

● नगर परिषद दुधनी

दुधनी येथील नगरपरिषदेच्यावतीने समाज सुधारक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त बसवेश्वर महाराजांचे प्रतिमापूजन येथील मेडीकल उद्योजक संतोष अमाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मल्लिनाथ म्हेत्रे, चन्नमल्लप्पा पाटील, रामचंद्र अत्ते, शांतलिंग चिंचोळी, मौलप्पा गायकवासमवेत इतर नागरिक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!