गुरुषांत माशाळ,
दुधनी दि. ६ एप्रिल : दुधनी शहरातील व्यापाऱ्यांनी अंशतः लॉकडाउनला विरोध दर्शविले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनांबरोबर कापड दुकान, स्टेशनरी दुकान, फुटवेअर,भांडयाची दुकाने आणि इतर छोट्या-मोठ्या दुकाने कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू ठेवण्यास आदेश द्यावे यासाठी दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांना निवेदन देण्यात आले.
सद्या शहरात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात व्यवसायांवर संकट आले आहे. त्याच्यामधून आम्ही अजून सावरलो नाही. वर्ष भरापासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यावर आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतलेला निर्णय व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे.
गेल्या वर्षभरात सर्व दुकाने बंद होते. बंद काळात बँकेचे हफ्ते, लाईट बिल, दुकान भाडे, इतर प्रकारचे टॅक्स, नौकर वर्गाचा पगार असे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. बँका कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग हा अगोदरच रसातळाला गेला आहे. त्यात हा लॉकडाऊन जीवघेणा ठरत आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ५ एप्रिलपासून जाहीर केलेला हा अंशतः लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या मुळावर असून तात्काळ मागे घेण्यात यावा, विकेंड लॉकडाउनला आम्ही संपुर्ण सहकार्य करू. शहरातील सर्वप्रकारच्या दुकाने काही नियम-अटी घालून काही तासांसाठी का होईना चालू ठेवण्यास मुभा द्यावे. अशी मागणी व्यापाऱ्यांनी दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सिद्धाराम येगदी, रामचंद्रप्पा बिराजदार, शिवानंद मंथा, महावीर गांधी, सैदप्पा कोतली आणि इतर व्यापारी उपस्थित होते.
चौकट १): सद्या लग्न सराई असल्याने आम्ही लाखो रुपयांची माल दुकानात भरलेला आहे. तो नाही विकलं तर आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला काही सकाळी ९ ते ०२ पर्यंत दुकाने उघडण्यास सवलत द्यावे – अनंत कासार,भांडे विक्रेते, दुधनी
चौकट २): दुधनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयांच पालन करावं आणि अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य करावं हे सर्व नियम जनहितासाठी आहेत – मुख्याधिकारी अतिष वाळुंज दुधनी नगरपरिषद दुधनी