ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अर्थचक्र पूर्ववत होण्यासाठी सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात- खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर : देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने विशेष रेल्वेचा दर्जा रद्द करून सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात. अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी व प्रवाश्यांच्या सोयीसाठी सर्व रेल्वे सुरु व्हाव्यात. तसेच सोलापुरात बुलेट ट्रेनला थांबा मिळावा, सोलापूर नवी दिल्ली नवी रेल्वेसेवा, वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी या विविध मागण्यांचे निवेदन खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिले.

सध्या संसदीय अधिवेशन चालू असून सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या सर्व समस्या घेऊन खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. सुरुवातीला रेल्वे राज्यमंत्रीपदी दायित्व मिळाल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने नॅपकिन बुके देऊन सन्मान करीत त्यांचे अभिनंदन केले. भविष्यात होणारे प्रकल्प व सध्या उद्भविणाऱ्या अडचणींचे निवेदन देत समस्स्यांवर प्रकाश टाकला. रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मकपाने सर्व सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे सांगितले.

या निवेदनात, मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. सध्या याबाबत सर्वे सुरु असून बुलेट ट्रेन ला सोलापुरात थांबा मिळण्यासाठी सोलापूरकरांनी मागणी आहे. त्यामुळे सोलापुरात थांबा मिळावा. सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान केवळ एकाच रेल्वे आहे. परंतु या मार्गात प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान दुसरी नवीन रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी कार्यवाही व्हावी.

त्याचप्रमाणे, सोलापूर-मुंबई- सोलापूर दरम्यान प्रवाश्यांची वाढती संख्या पाहता सोलापूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु व्हावी. प्रवाश्यांसह सोलापूर पुण्यातील व्यापाऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांना बसवा एक्स्प्रेसला (रेल्वे क्रमांक १७३०७/३०८) अक्कलकोट रोड स्थानकावर मिळण्यासाठी मागणी केली होती. हि मागणी अत्यंत महत्वाची असून प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर अक्कलकोट रोड स्टेशनवर थांबा मिळावा.

विशेषतः सध्या सर्वत्र अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने सर्व रेल्वे सेवा पूर्ववत सुरु व्हाव्यात. रेल्वेला दिलेला विशेष दर्जा रद्द करून सोलापुरातून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या हुतात्मा सुपरफास्ट, सोलापूर पुणे पॅसेंजर, सोलापूर विजयपूर गोलघुमट एक्सप्रेस, सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस, सोलापूर सिकंदराबाद पॅसेंजर एक्सप्रेस, सोलापूर गुंतकल पॅसेंजर या सर्व रेल्वे १५ ऑगस्टपासून सुरु कराव्यात. सर्वसामान्यांना याचा लाभ होत अर्थचक्राला गती मिळेल असेही खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे मागण्या मांडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!