गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबीराचे आयोजन करणारे अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव पहिले न्यास – तहसिलदार बाळासाहेब सिरसट
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालूक्यातील गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबीराचे आयोजन करणारे अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव पहिले न्यास असल्याचे मनोगत तहसिलदार बाळासाहेब सिरसट यांनी व्यक्त केले. न्यासाने दिलेल्या लसीमुळे तालुक्यातील ४ हजार गोवंशीय जनावरांना लसीकरण होणार आहे. ते राजे फत्तेसिंह क्रीडांगण शेजारी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना येथे मंगळवारी न्यासाच्या वतीने आयोजित केलेल्या तालूक्यातील गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान श्रींच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पशुपालक शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, पशुधन विकास अधिकारी डॉ.अक्षय पागधुने, तालुका पशुधन अधिकारी डॉ.दिनेश मुरुमकर, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मानद लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, तहसील कार्यालयाचे प्रशासन अधिकारी संजय सोनटक्के आदिजन उपस्थित होते.
पुढे बोलताना तहसिलदार बाळासाहेब सिरसट म्हणाले की, अमोलराजे भोसले यांनी काळाची गरज ओळखून तालुक्यातील पशुधनासाठी न्यासाच्या माध्यमातून केलेले नियोजन उल्लेखनीय असून, अन्नछत्र हे न्यास नेहमीच धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे सांगून, गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोग या संदर्भात उपस्थित पशुपालक शेतकऱ्यांना माहिती दिले.
याप्रसंगी बोलताना तालुका पशुधन अधिकारी डॉ.दिनेश मुरुमकर म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत संकट काळात मदत करण्याची भूमिका घेतली जाते. सध्या देशात व राज्यात गेल्या एक महिन्यापासून गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोग झपाट्याने पसरत आहे. लम्पी हा रोग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील पशुधन व शेतकऱ्यांचे रोजगार वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम न्यासाने हाती घेतले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या लसींची वाट ना पाहता न्यासाने त्वरित उपलब्द करून दिल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. याबरोबरच पशुपालकांना लम्पी बाबत मार्गदर्शन याप्रसंगी केले.
पुढे बोलताना पशुधन विकास अधिकारी डॉ.अक्षय पागधुने, म्हणाले की, सोलापूर जिल्यात सदर रोगाची लागण ही माळशिरस, सांगोला, माढा या तालुक्यातील जनावरांना झाली आहे. सदरच्या तालुक्याची परिस्थिती लक्षात घेऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पशु-पालक शेतकऱ्यांच्या हितार्थ सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.पागधुने यांनी सांगिले. यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना लम्पी बाबत जनजागृतीची माहिती देऊन, न्यासाने दिलेल्या लसीमुळे ४ हजार गोवंशीय जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.
या कार्याक्रामाचे प्रास्ताविक, स्वागत, सूत्रसंचालन व आभार न्यासाचे विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे यांनी मानले. याप्रसंगी मनोज निकम, वैभव नवले, प्रथमेश पवार, वैभव मोरे, काशिनाथ कदम, दीपक नडगीरे, विशाल कलबुर्गी, सनी सोनटक्के, कुमार पाटील, महेश डिग्गे, प्रवीण नडगीरे, शुभम सावंत, शुभम चव्हाण, मल्लू रेवी, फहीम पिरजादे, कल्लप्पा छकडे, सुधाकर धायगोडे, दीपक लांडगे, स्वामिनाथ खुने, सय्यद जागीरदार, प्रवीण घाडगे, संजय गोंडाळ, अप्पू म्हेत्रे, निखील पाटील, पिंटू साठे, तानाजी माने, किसनराव मोरे, शिरीष पाटील, आकाश विभूते, विराग मानशेट्टी, राहुल शिंदे, राहुल इंडे, नामा भोसले, बाळा पोळ, अतिश पवार, अक्षय पाटील, सागर सूर्यवंशी, नागेश बिराजदार यांच्यासह पशुपालक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
पशुपालाकांनी लाभ घ्यावेत :
अक्कलकोट तालुक्यात जनावरांचा धोका टाळण्यासाठी व लम्पीला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंध शिबिराचा लाभ घ्यावेत, याकरिता तालुक्यातील पशु-पालक शेतकऱ्यांच्या हितार्थ सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे – अमोलराजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट