नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम हे चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची आज शुक्रवारी २६ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील निवडणूक होत असून एकत्रित पाचही राज्यांचा निवडणूक निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम :
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात
पहिला टप्पा – 27 मार्च
दुसरा टप्पा – 1 एप्रिल
तिसरा टप्पा – 6 एप्रिल
चौथा टप्पा – 10 एप्रिल
पाचवा टप्पा – 17 एप्रिल
सहावा टप्पा- 26 एप्रिल
सातवा टप्पा- २६ एप्रिल
आठवा टप्पा- २९ एप्रिल
तामिळनाडू : एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान
आसाममध्ये :
पहिला टप्पा – २७ मार्च
दुसरा टप्पा- १ एप्रिल
तिसरा टप्पा- ६ एप्रिल
पदुच्चेरी : एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान
केरळ : ६ एप्रिल रोजी मतदान
पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडत असून 18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 लाख मतदान बुथ केंद्र उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे.