ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात आल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ च्या घोषणा!

पुणे : PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

PFI च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!