चिंता वाढविणारी बातमी..! दक्षिण आफ्रिकेतुन कर्नाटकात आलेल्या दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, आरोग्य विभागाची उडाली तारांबळ
बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूचे नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’च्या धोक्याच्या दरम्यान, कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी आली आहे.
दक्षिण आफ्रिकेहून भारतात आलेल्या दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीवेळी दोन प्रवासी कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे बंगळुरु विमानतळावर, आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडाल्याच पहायला मिळाले.
बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दक्षिण आफ्रिकेतुन आलेल्या दोघांचा विमानतळावर स्वाब घेतल्यानंतर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण नव्या कोरोना व्हायरसची, ओमीक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा कोणताही अहवाल आला नसल्याचे माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १० हाय रिस्क देशांमधून ५८४ प्रवासी बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी ९४ प्रवासी हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतून आलेले आहेत.
या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. जोवर ते नव्या व्हेरिअंटने बाधित आहेत की नाहीत हे समोर येत नाही, तोवर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाणार आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.