सोलापूर, दि.27 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम अथवा खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी ( विद्यापीठांसाठी), 2021 साठी नामांकने 21 जून 2021 पर्यंत सादर करण्याबाबत कळविले आहे.
या पुरस्काराबाबतची नियमावली तसेच विहित नमुन्यातील अर्ज हे https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिनांक 21 जून 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. केंद्र शासनास [email protected] किंवा [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर (दूरध्वनी क्रमांक 0217-2607144) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.