ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कलादिग्दर्शक राकेश साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे : कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांच्या आत्महत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीचा मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकारणातील मुख्य आरोपी राकेश मौर्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आला असता त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!