ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारताने दिले चीनला जशास तसे उत्तर, भारतीय सैन्याने फडकविला गलवान खो-यात तिरंगा !

नवी दिल्ली : भारताच्या हद्दीत नेहमीच घुसखोरी करणा-या चीनची आगळीक अद्याप सुरूच आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी भारत-चीन सैन्यादरम्यान संघर्ष झालेल्या गलवान खो-यात चीनने त्यांचा राष्ट्रध्वज फडकविल्याचा दावा केला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनकडून गलवान खो-यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हीडीओ शेअर केले होते.

चीनच्या या कृतीनंतर आता भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर देत गलवान खो-यात भारताचा ध्वज फडकविला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून ध्वज फडकविण्यात आल्याचे फोटो मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी शेअर करण्यात आले.

गलवान खो-यात ध्वज फडकावल्याचे फोटो आणि व्हीडीओ चीनकडून व्हायरल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एक ट्विट करून गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावे लागेल, मोदीजी मौन सोडा, असे म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!