कोरोना काळामध्ये आशा सेविकांचे काम कौतुकास्पद; युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचे प्रतिपादन, कुरनूर येथे विविध पुरस्कारांचे वितरण
कुरनूर दि.११ कोरोनाच्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता लोकांच्या सेवेसाठी घरोघरी जाऊन आशा सेविकांनी केलेली रुग्णांची सेवा हे कौतुकास्पद आहे. अशा कोरोना योद्धांच सन्मान करणे हे प्रत्येक गावाचं प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असतं. जेणेकरून याच्या पुढच्या काळातही त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आशा सेविकांनी कोरोना मध्ये दिलेले योगदान हे अमूल्य आहे. असं प्रतिपादन अक्कलकोट महिला काँग्रेसचे अध्यक्षा युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केलं. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होत्या.
पुढे बोलताना शितल म्हेत्रे यांनी राजकीय टोलेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेत विरोधकांवर सडकून टीका केली. आत्ताच राजकारण आणि पूर्वीच राजकारणामध्ये फरक आहे.काँग्रेसने कधीच जातीपातीचा राजकारण केलं नाही. मात्र भाजप सरकारने जातीपातीचा राजकारण करून देशांमध्ये हुकूमशाही चालू केली आहे. केंद्रीय यंत्रणेचा वापर करत ते लोकशाही धोक्यात आणले आहेत. काही झाले तरी पुन्हा एकदा सिद्धाराम म्हेत्रे यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
आताचे सत्ताधारी निवडणूक झाली की पुन्हा आपल्याकडे फिरकतही नाहीत.त्यामुळे सर्वसामान्यांचा विकास कसा होणार? कोण लक्ष देणार असा प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे.तेव्हाच्या तालुक्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा, विकास होणार आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी येथील धरणाचा विषय असो, अथवा कुरनूर गावाचं पुनर्वसन असो, मोलाचे योगदान देऊन या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कुरनूर ला यापूर्वी मी आले होते. आता ही माझी दुसरी वेळ आहे.यापुढे देखील मी येत राहीन, गावावर माझ असच प्रेम राहील.
लोकांच्या सेवेसाठी मी आणि म्हेत्रे परिवार सदैव तत्पर असेन असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या हस्ते आशा सेविकांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रमिला काळाप्पा कुंभार, ललिता दिनकर काळे, सायरा करीम जमादार, परवीन सय्यद जमादार, यांना कोरोना काळामध्ये योगदान दिल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपले पती देशासाठी शहीद झाले असताना पुन्हा दोन्ही मुलांना भारतीय सैन्य दलामध्ये पाठवून गावासमोर वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल ‘आदर्श पालक पुरस्कार’ म्हणून महानंदा जगन्नाथ काळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी R J प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.