आसाम-मेघालय सीमावाद पेटला ! दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला
आसाम : आसाम आणि मेघालयातील सीमावाद पुन्हा पेटला असून, पोलीस गोळीबारात सहाजण ठार झाले आहेत. यामध्ये मेघालयातील पाचजणांचा समावेश आहे. दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. मेघालयाने ७ जिह्यांमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.
दरम्यान, मार्च २०२२ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांमध्ये ७० टक्के सीमावाद संपल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांचा दावा अवघ्या आठ महिन्यांत फेल झाला आहे. काल आसामच्या पश्चिम कारबी अॅगलॉग जिह्यात वनविभागाच्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मेघालयातून आलेला ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला.
या वेळी ट्रकमधील लोकांनी हल्ला केला. जादा पोलीस कुमक मागवून लाकडाची तस्करी करणाऱया ट्रकचा पाठलाग केला. पश्चिम जयंतिया हिल्स भागात आसाम पोलिसांनी गोळीबार करून ट्रक थांबवला. गोळी बारात पाचजण ठार झाले. जमावाने केलेल्या हल्ल्यात आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला, अशी माहिती आसाम पोलिसांनी दिली आहे.