सोलापूर दिनांक : २२ जुलै २०२१ रोजी आरोग्य समिती सभा जिल्हा परिषदे सोलापूर येथील शिवरत्न सभागृह येथे उपाध्यक्ष् तथा सभापती आरोगय समीती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरवातीला दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून सभेस सुरुवात करण्यात आली.
सर्व प्रथम जिल्हयातील ग्रामीण भागामध्ये नियोजनबध्द पध्दतीने व कौशल्याने कोवीड-१९ची साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणल्याबददल सोलापूर आरोग्य विभागाचे आषाढी वारीमध्ये मा. मुख्यमंत्री यांनी विशेष अभिनंदन केले. त्या अनुषंगाने आजच्या आरोग्य समीती सभेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांचा व त्यांच्या संपूर्ण टिमचा सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव घेऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सदरचा सत्कार हा माझा नसून आरोग्य समीतीच्या सर्व सदस्यांचा व उपाध्यक्ष यांचा आहे.
यापुढील आगामी काळात सोलापूर जिल्हयातील मंजूर ४३ उपकेंद्र प्रस्तावित असून आगामी काळामध्ये कुठलेही उपकेंद्र वगळण्यात येउ नये अशा सर्व सदस्यानी सुचना मांडल्या व तसेच सोलापूर जिल्हयासाठी कोवीड-१९ ची जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली व त्याबाबत जास्तीचे लस पुरवठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा अशा सदस्यांनी सुचना केल्या.
प्राथमीक आरोग्य केंद्राच्या कंत्राटी वाहनचालकाच्या वेतनाबाबत मा. उच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशानुसार कार्यवाही होण्याबाबतच्या सुचना सदस्यांनी केल्या.
सदर सभेस निलकंठ देशमुख , अरुण तोडकर, अण्णासाहेब बाराचारे, अतुल खरात, स्वाती कांबळे, रुक्मीणी ढोणे तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. सोनीया बागडे , जिल्हा माता व बालसंगोपनअधिकारी डॉ अनिरूध्द पिंपळे , तालुका आरोग्यअधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.