ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हन्नुर येथे बालिका दिनानिमित्त बेटी पढाव बेटी बचाव अभियान ; प्रभात फेरीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट विधी सेवा समिती, अनंत चैतन्य प्रशाला हन्नुर व ग्रामपंचायत हन्नुर यांच्यावतीने जागतिक बालिका दिनानिमित्त बेटी पढाव बेटी बचाव अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश बी. एस. गायकवाड मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

प्रारंभी अनंत चैतन्य प्रशालेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातील प्रमुख पाहुण्यासह गावातील प्रमुख मार्गावरून बेटी बचाव बेटी पढाव हा नारा देत प्रभात फेरी काढण्यात आली.या कार्यक्रमाला
सह दिवाणी न्यायाधीश जी.बी . नंदागवळे,आर. एम शेख, ज्येष्ठ नेते सिद्धाप्पा कल्याणशेट्टी, उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, संचालक शिवप्पा भरमशेट्टी, मुख्याध्यापक बापुजी निंबाळकर, वकिल संघाचे अध्यक्ष विजय हर्डीकर, व्ही.बी पाटील, प्रा.
गौतम बाळशंकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

विधीज्ञ व्ही.बी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून कायद्याचे ज्ञान होणे आवश्यक आहे, अशा पद्धतीचे विचार प्रास्ताविकातून व्यक्त करण्यात आले. वकील संघाचे अध्यक्ष विजय हर्डीकर यांनी मनोगत व्यक्त करताना स्त्री पुरुष समानता लिंगभेद, अधिकार आणि स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भात मुलींना शिकवण्या संदर्भात, स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात विचार व्यक्त केले.  यावेळी अंगणवाडी सेविकेच्यावतीने ‘एक मुलगी एक वृक्ष ‘हा उपक्रम राबवून गावातील बालिका तेजस्वी बाळशंकर या बालिकेचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अधिक्षक यु.आर कुलकर्णी, स्वप्निल मोरे, विलास बिराजदार, शहाजी माने, आप्पासाहेब काळे,सुरेश जाधव,राजेंद्र यंदे,विश्वनाथ चव्हाण स्वामीनाथ कोरे,ज्योती बाळशंकर ,नयाबाई बाळशंकर, अश्विनी इरवाडकर आदी उपस्थित होते.आभार अशोक साखरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!