मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन लांबणीवर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
मुंबई : कोकणात पावसाने घातलेला धुमाकुळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणारी भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. “दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” असंही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहेत.
कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल.
दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद मनाववा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 25, 2021
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन उद्या दिनांक 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र राज्यातील पुर आणि भुस्कलनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.