मुंबई,दि.१९ : कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
1 मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा राबविण्यात येणार आहे त्यात सर्वांना ही लस मिळणार आहे.
देशात गेल्या जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू आहे.सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत त्यांना कोरोना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आणि आता 1 मे पासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.