मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वरे तयार करण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर दुपारी एक वाजता mahresult.nic.in, mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या साईटवर जाऊन पहावे.
★ निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करावा.
● दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहु शकता.
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
maharashtraeducation.com
त्या नंंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट हा ऑप्शन निवडावा.
● त्यानंतर आपला रोल नंबर,नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
● Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
● त्यानंतर तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकाल.
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021