ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अशी मागणी सर्व स्तरातून होत होती.या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली होती.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, अधिकारी यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत ही बैठक झाली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ११ एप्रिलला होणार होती. मात्र राज्यातील वाढत्या कोरणा रुग्ण संख्येच्या धास्ती परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला घेतली आहे. एमपीएससीच्या परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थी कोरणा पॉझिटिव आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालक देखील पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेला उपस्थित राहणार विषयीचे अडचणी आहेत. गेल्या आठवड्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्गाचे कारण देत १४ मार्च होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मागणीचा विचार करून राज्य सरकारने १४ मार्च परीक्षा २१ मार्चला घेण्याचे आणि त्यासोबत ११ एप्रिल ला होणारी परीक्षा वेळापत्रक प्रमाणात होईल असे जाहीर केले होते. आता राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!