अक्कलकोट :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी 246 वी जयंती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी मोठय़ाने गाजावाजा न करता घरीच साजरा करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राष्ट्रीय कार्यक्रमाच्या स्वरूपात न साजरी करता आपल्या घरावर पिवळा झेंडा लावून पारंपरिक धनगरी वेशभूषा पिवळा फेटा, घोंगडी, काठी बेल भंडारा माथी लावून तसेच आपल्या घरातील महीलांना नऊवारी साडी नेसून आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांसमवेत फोटो पुजन करुन जयंती साजरी करावी.
सध्या जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे, त्यामुळे आपण जाहीर कार्यक्रम घेऊ शकत नाही.तरी राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा घरावर लावून आपल्या घरी अहिल्यादेवींची जयंती साजरी करायची आहे. कोरोनाच्या काळात आक्सीजनचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
“प्राण्यांसाठी तळे आणि पक्षांसाठी मळे” राखीव ठेवणा-या अहिल्यादेवींची जयंती साजरी करताना सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने जयंती निमित्त किमान एक झाड लावून नैसर्गीकरित्या आक्सीजन निर्माण होण्यासाठी मदत करू जेणेकरून येणाऱ्या काळात त्याचा तुटवडा भासणार नाही.
तसेच या शुभदिनानिमित्त कोरोनाच्या नियमांचे पालन करून काळजी घेऊन जयंती साजरी करावी आणि सर्व कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी सक्रिय सभासद नोंदणी करावी. असे आवाहन सुनिल बंडगर यांनी केले आहे.