ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडुन “यांना” देण्यात आली उमेदवारी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पाच जागांसाठी काल भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईमधून राजहंस सिंह यांना नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे तर कोल्हापूरमधून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारमधून वसंत खंडेलवाल, अकोला-बुलडाणा-वाशिममधून अमरीश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोल्हापूरमधून भाजपकडून अमल महाडिक यांचं नाव निश्चित झाला आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही मोठे चेहरे डावलण्यात आले होते. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पत्ता कट झाला होता. त्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, बावनकुळे सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी यशस्वी नेतृत्व केलं. पक्षासाठी काम करत राहिल्याचं फळ आता बावनुकळेंना मिळालं आहे. त्यांना नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडूनस संधी देण्यात आली आहे.

• शिवसेनेकडुन दोन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर

शिवसेनेने देखील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बिजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्त कट करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!