मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले जात आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भात कोरोना रुग्ण संख्येत मोठ वाढ झाली आहे. पुण्यात रात्री संचारबंदीची घोषणा केली गेली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्येत वाढ होण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका होऊ लागली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधाला आहे.
महाविकासआघाडी सरकारने ४० हजार लशींच डोस वाया घालवल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते अयशस्वी ठरले आहे. साडेचार लाख आरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत. आरोग्य मंत्र्यांना दंड, गुन्हे दाखल, मार्शल लॉ हवा आहे, पण महाविकासआघाडी सरकारने नव्या पेंग्विन कारवान कायद्यावर १०० तास खर्च केलेत.” अशा शब्दांमध्ये शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
तसेच “मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कात सवलत असतानाही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची मागणी केली. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे आता समोर आले आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाबाबत शाळांकडून दिरंगाईच्या तक्रारी समोर आल्यात. ठाकरे सरकारचे हे कसले धोरण? समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या कंत्राटावर अर्थपूर्ण लक्ष आणि गरीब, मागासवर्गीय मुलांकडे पुर्ण दुर्लक्ष!” असं म्हणत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुद्यावरून देखील शेलार यांनी राज्य सरकारवर ट्विटद्वारे निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.