ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाराजीच्या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली “ही” प्रतिक्रिया

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फेटाळून सर्व आरोप लावली आहे. त्या बरोबरच नवनिर्वाचित मंत्र्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं आहे, असं पंकजा यांनी यावेळी सांगितलं.

पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या ‘समर्थकांमध्ये नाराजीची भावना असू शकते, पण व्यक्तिश: पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. मी अजिबात नाराज नाही,’ या संदर्भात चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी.. मी… असं चालत नाही… मला टीम नरेंद्रमध्ये कोण आहे?  टीम देवेंद्रमध्ये कोण आहे?  याबाबत माहिती नाही. भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांना संपवण्यासाठी वंजारी समाजातून भागवत कराड यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे, अशी शंका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय बोलतात याकडं लक्ष लागलं होतं. त्यांनी ही सर्व चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!