ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन, महाराष्ट्र पोलीस नव्हे हे तर महाविकास आघाडी पोलीस – आ.विजयकुमार देशमुख

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिव्य काशी भव्य काशी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणास पोलीस प्रशासनाने मज्जाव करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या संदर्भात भाजपतील नेत्या – कार्यकर्त्यांच्या भावना सध्या तीव्र असल्याने त्याच्या निषेधार्त आज शुक्रवारी जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले. राज्याच्या राजकारणात भाजप विरोधी पक्षात जास्त काळ राहिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा जास्त अनुभव आमच्याकडे असून, प्रशासनाच्या माध्यमातून शासनाची विनाकारण मुस्कटदाबी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. भाजपने सत्ताकाळात कधीच माज केला नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या वतीने विरोधकांवर प्रशासनाच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. देशामध्ये सर्वत्र दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम करण्यात आले परंतु तेथे कोठे गुन्हे दाखल झालेले नाहीत. म.पो. म्हणजे महाराष्ट्र पोलीस असते परंतु आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी पोलीस आहे अशी टीका माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी अंदोलनावेळी बोलताना केली.

सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन हे महाविकास आघाडी सरकारच्या हातचे खेळणे झाले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाचा वापर विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून पद्धतशीरपणे करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात विनंती निवेदन नव्हे तर शासन – प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी भाजपाच्या वतीने रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी आंदोलन वेळी बोलताना दिला.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम,आ.विजयकुमार देशमुख, सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, युवा नेते मनीष देशमुख शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक विनायक विटकर, माजी उपमहापौर शशिकला बततुल, नगरसेवक नारायण बनसोडे, नगरसेवक संतोष भोसले, नगरसेवक अविनाश बोमडयाल, नगरसेवक सुनील कामाठी, नगरसेवक डॉ.किरण देशमुख, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक रवी कय्यावले, नगरसेवक राजकुमार हांचाटे, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक नागेश वल्याळ, बिज्जू प्रधाने, नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका शोभाताई बनशेट्टी, सचिन कुलकर्णी, शिवराज पवार, राजभाऊ काकडे, रुदरेश बोरामनी, विनय ढेपे, महिला अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, नगरसेविका राजश्री कणके,नगरसेविका अंबिका पाटील, नगरसेविका शालन शिंदे, रामेशवरी बीररू, मुटगुरी, रेखा गायकवाड, गणेश जाधव, बाळासाहेब अवसंडे, सिद्धू बोरले, बीरेश गुंदगे, राजाभाऊ गायकवाड, धोंडिबा हिबरे, बाबुराव जामदार, योगेश कबाडे, श्रीनिवास पुरुड, ज्ञानेश्वर कारभारी, अश्विन गायकवाड, गणेश साखरे, राम वाकसे, किरण पवार, राजाभाऊ आलूरे, समाधान आवळे, सतीश महाले, अनिल कंदलगी, राजकुमार पाटील, संदीप दुगाने, संदीप जाधव, श्रीकांत घाडगे, शेखर फंड, आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!