राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये २२३ जणांचे रक्तदान; कोरोना संकटातही कार्यकर्त्यांचा मिळाला प्रतिसाद
अक्कलकोट, दि.६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन आणि तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त २२३ जणांनी रक्तदान केले.अक्कलकोटच्या टिनवाला फंक्शन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोव्हिड- १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला. या शिबिराचे उदघाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज निकम, मल्लिकार्जुन पाटील,
विलास गव्हाणे, आनंद तानवडे, बसलिंगप्पा खेडगी, गफुर शेरीकर, मल्लिकार्जुन काटगाव, बाबा निंबाळकर, सिध्दप्पा कल्याणशेट्टी, सुरेशचंद्र सूर्यवंशी, माणिक बिराजदार, मुन्ना राठोड, विक्रांत पिसे, राजु सलगरे, मैनुद्दीन कोरबू, ज्ञानेश्वर बनसोडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिले.
लॉकडाउन असतानाही ग्रामीण भागातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी सिद्धे यांच्या प्रेमापोटी कोरोनाचे सर्व नियम पाळत या शिबिराला हजेरी लावून सिद्धे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी सोलापूर ब्लड बँक आणि हेडगेवार रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यावर्षी तर कोरोनाचे संकट आहे अशा परिस्थितीमध्ये रक्तदान शिबिराची खूप गरज होती म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि गरज ओळखून हा उपक्रम राबविले असल्याचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी सांगितले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अविराज सिद्धे, नवनीत राठोड, बंटी पाटील, श्रीशेल चितली, राहूल राठोड, संजय जमादार, आकाश तुवर, सतिष सुरवसे, सागर सोमवंशी, यतिराज सिध्दे, दर्शन चव्हाण, धनंजय मचाले, प्रकाश टाके, बसु पाटील, रशीद खिस्तके आदींनी
परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबीरात रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्याचे आभार सुनिल सिध्दे यांनी मानले.तालुक्यातील बादोले गावातही दिलीप भाऊ सिध्दे यांच्या वाढदिवसानिमत्त नागरिकांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले.