सोलापूर दि .२४ – कोरोना महामारी मुळे जगभरातील लोकात नैराश्य आले असून सर्वत्र दुःखाचे सावट आहे. अशावेळी उत्तम ग्रंथांच्या वाचनामुळे जगण्याची उमेद आणि बळ मिळते ते जीवन समृद्ध करण्यास मदत करतात, लॉक डाऊन मुळे लोक घरात बंदिस्त झाले असून त्यांनी ग्रंथांचे, वृत्तपत्रांचे, व मासिके यांचे वाचन करून वेळेचा सदुपयोग करावा असे मनोगत सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी व्यक्त केले.
जागतिक ग्रंथ दिनानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयात ग्रंथांचे पूजन करण्यात आले त्याप्रसंगी शिनखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी स्वागत केले.हा कार्यक्रम कोरोना विषयक शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जुळे सोलापूर मसापचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, ग्रंथपाल दत्ता मोरे, ग्रंथालय कर्मचारी जगदीश इमडशेट्टी, सुनील अवचारे यांची उपस्थिती होती.