ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अनावश्यक खर्चाला फाटा देत गणेश मंडळाकडून मठास खुर्च्या भेट ,बोरगाव दे येथील मंडळाचा उपक्रम

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट ,दि २०: अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव दे येथील श्री बसवसिद्ध गणेशोत्सव तरुण मंडळांनी उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरवणूक खर्चातील पैशाची बचत करून श्री वीरशैव लिंगायत मठास फायबरच्या ८० खुर्च्या भेट दिल्या आहेत.कोरोना
महामारी व शासनाचे निर्बंध यामुळे यंदाही गणेशोत्सवावर सावट दिसून आले.बँड बाजा, डॉल्बी देखावे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्याने वर्गणीच्या माध्यमातून जमा झालेले पैसे कुठेही खर्च न करता वीरशैव लिंगायत मठास खुर्च्यारुपी भेट दिले.या मठात वर्षभर अनेक कार्यक्रम साजरे होतात.या निमित्ताने गरज ओळखून ही भेट आवश्यक होती त्यामुळे मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.श्री बसवसिद्ध गणेश तरुण मंडळ व त्यांचे पदाधिकारी वर्षभर वेगवेगळे विधायक व स्तुत्य कार्यक्रम राबवत असतात.गोरगरीब शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करणे,अडीअडचणीत हातभार लावणे,संकट काळी धावून जाणे,गरजवंताला मदत करणे हे वर्षभर चालत असते. गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत ८० फायबरच्या खुर्च्या भेट दिल्याने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.यावेळी मंडळाचे अध्यक्ष वीरभद्र व्हगाडे,उपाध्यक्ष शिवराज जिरगे, खजिनदार शरणप्पा सुरापुरे,सचिव अनिल जिरगे,चेअरमन बसवराज कलशेट्टी,दत्ता जिरगे,आनंद कलशेट्टी अशोक जिरगे,बसवराज कल्याणी राजेंद्र सुरापुरे, महेश कल्याणी, भागेश जिरगे, श्रीकांत जिरगे, शरणप्पा जिरगे,प्रशांत कामशेट्टी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!