ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग..! दहावीच्या परीक्षा अखेर रद्द,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे. ती म्हणजे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी या वेळी दिली.

तर इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा कोरोनाचा विकोप कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार होत्या. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

देश भरातील सात ते आठ राज्यांनी ज्या पद्धतीने १०वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत ज्या पद्धतीने दहावीतील विद्यार्थ्यांना ११वी च्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय राज्यात घेण्यात यावा. ज्या मुलांना परीक्षा द्यायचं आहे त्यांना ती देण्याची मुभा असावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

त्या या विषयावर सविस्तर चर्चा करून एकमत झाल्या नंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!