ध्यास विश्वसार्ह बातमीचा

BREAKING..! बसवराज बोम्माई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बी. एस. यडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांनी आज सायंकाळी भाजप आमदारांची बैठक बोलाविले होते.माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा आणि गोविंंद कारजोळ यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी बसवराज बोम्माई यांचे नाव सुचवले होते.त्यानंतर  सर्वानुमते ही निवड करण्यात आली.

बसवराज बोम्माई हे कर्नाटकचे २०वे मुख्यमंत्री असतील. या सोबतच तीन उपमुख्यमंत्र्यांची निवड सुद्दा करण्यात आली आहे. यामध्ये आर. अशोक, गोविंद कारजोळ, श्रीरामलु यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

जनता दल सेक्युलर सोडल्यानंतर भाजपमध्ये सामील झालेले बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्माई यांचे सुपुत्र आहेत.बसवराज बोम्माई माजी मुख्यमंत्री बी.एस.यडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री पद भूषविले होते. बसवराज बोम्माई उद्या दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!