ध्यास विश्वसार्ह बातमीचा

BREAKING..! मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील पूर बाधित भागाची पाहणी.

कोल्हापुर : राज्याचे मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापुर जिल्याच्या दौर्यावर आहेत. महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघेही कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात, पूरग्रस्त लोकांशी दोन्ही नेत्यांनी संवाद साधला.

उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्र महोदयांचे स्वागत केले.

कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांची अचानक समोरासमोर भेट झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी रस्त्यातच एकमेकांशी काही वेळ चर्चा केली.

शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय येथील निवारा केंद्रातील पुरबाधित कुटूंबाची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी, कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!