ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Breaking..! सत्यजीत तांबेंसाठी सुधीर तांबेंची नाशिक पदवीधर निवडणुकीतून माघार!

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे. त्यांनी आपला मुलगा सत्यजीत तांबे यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या मतदारसंघातून आता सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील.

ही निवडणूक मीच लढवावी अशी काँग्रेसच्या नेतृत्वाची व पक्षश्रेष्ठींचीही इच्छा होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळं बाबांच्या नावाची घोषणा झाली. आता मीच ही निवडणूक लढवणार आहे. मी अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक जीवनात कार्यरत आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी मला पाठिंबा द्यावा असा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी मी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांबरोबरच शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाजपच्या नेत्यांचीही भेट घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!