दक्षिण सोलापूर दि.१६: सोलापूर शहरातील रूग्णालय कोरोनाबांधित रुग्णामुळे फुल्ल झाल्याने सध्या रूग्णासाठी एकही बेड शिल्लक नाही त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी मंद्रूप,बोरामणी,कुंभारी येथे कोविड ऑक्सिजन रूग्णालय तातडीने उभारण्यात यावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी समितीच्या मासिक बैठकीत केले आहे.
शुक्रवारी दक्षिण सोलापूर पंचायत समितीची मासिक बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आले या बैठकीत कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीसह विकासकामांचा आढावा घेतला.यावेळी धनेश आचलारे म्हणाले,
देशात सध्या ४ दिवसांचे लसीकरण महोत्सव सुरु आहे. दक्षिण तालुक्यात १४६७७ लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.तरी लोकांना घरोघरी लसीकरण करण्यात यावेत.वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन तालुक्यातील कोरोनाबांधित रूग्णाना सोलापूर शहरात बेड उपलब्ध होत नाहीत.उपचाराभावी कोणाचाही मृत्यु होऊ नये.यासाठी बोरामणी,मंद्रुप,कुंभारीत कोविड ऑक्सिजन रूग्णालय तातडीने उभारण्यात यावेत.
हे रूग्णालय उभारण्यासाठी तालुक्यातील उद्योगपती,पाॅवरग्रीड व एनटीपीसी वीज प्रकल्प,झुआरी व चेट्टीनाड,वासुदत्ता,बिर्ला हे सर्व सिमेंट कंपन्या,तसेच किर्ती गोल्ड कंपनी आशा कंपन्या कडून मदत घेऊन तालुक्यात लवकरात लवकर कोव्हीड ऑक्सिजन रूग्णालय उभा करण्यात यावा अशी मागणी धनेश आचलारे यांनी केले आहे.सध्या शेतकऱ्यांचे वीजतोडणी सुरू आहे.ते त्वरित थांबवावेत.जिथे वीज तोडणी झाली असेल तेथील वीज जोडण्यात यावेत.ज्या गावानी पाण्याची टॅकर मागणी केली असेल तर त्वरीत टॅकर उपलब्ध करून द्यावीत.
तालुक्यात पाच अंगणवाडी सेविका तसेच ३१ मदतीस पदे रिक्त आहेत त्या सर्व जागा तातडीने भराव्यात.यासह आदी ठराव आचलारे यांनी मांडून त्या मंजूर करून घेतल्या.या बैठकीला सभापती सोनाली कडते,उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समिती सदस्य ताराबाई पाटील,रेखा नवगिरे,शशीकांत दुपारगुडे यांच्यासह गटविकास अधिकारी राहुल देसाई व विविध खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.