ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पण…. विजय वडेट्टीवार यांना अजून काही वेळ वाट पहावी लागेल

मुंबई : लोणावळ्यात 26 जून आणि 27 जून रोजी ओबीसी नेत्यांचा सर्वपक्षीय शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी 27 जूनला आपल्या भाषणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करतो, म्हणून महसूल खाते भेटेल असं वाटले होते. मात्र आपण ओबीसी नेते असल्यामुळेच आपल्याला महसूल खाते मिळू शकलं नाही, अशी खंत आपल्या भाषणातून विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली होती. यावर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, काँग्रेस पक्ष जातीयवाद किंवा धर्मवाद मानणारा पक्ष नाही. काँग्रेसने अनेक नेत्यांना मोठ्या संधी दिल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात विजय वडेट्टीवार यांना देखील मोठी संधी मिळेल असे सूचक वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

“काँग्रेस पक्षात सर्वांना संधी दिली जाते. येणाऱ्या काळात विजय वडेट्टीवार यांना मोठी संधी दिली जाईल, पण अजून काही वेळ विजय वडेट्टीवार यांना वाट पहावी लागेल” असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिला आहे.

काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक तसेच माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना देखील संधी दिली. त्याच प्रकारे विजय वडेट्टीवार यांना येणाऱ्या पुढील काळात संधी मिळू शकते, असे सूचक वक्तव्य ही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले. काँग्रेस पक्ष हा जातीवादी किंवा धर्मवादी पक्ष नाही. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असेही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!