ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेघर, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यान्वित, समस्यांबाबत करा 14567 वर कॉल

सोलापूर,दि.7: राज्यातील बेघर, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमाने 14567 टोल फ्री राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे. ही हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशनतर्फे चालविली जात आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी समस्या, तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पनाईन 14567 यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!