ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा ; लेफ्टनंट पदासाठी देशातून चैतन्य दिवाणजीची एकमेव निवड

 

सोलापूर :  सर्विसेस सिलेक्‍शन बोर्ड (एसएसबी)च्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झाली आहे. या पदासाठी निवड झालेला चैतन्य देशातील एकमेव युवक आहे.
चैतन्य दिवाणजी याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अक्कलकोटच्या आयएमएसमध्ये, संगमेश्‍वर महाविद्यालयात बारावी पर्यतचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी पुणे येथील एम.आय.टी.मधून घेतली. चैतन्यच्या डोळ्यासमोर सुरवातीपासूनच भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. त्याने अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात लष्कराद्वारे सर्विसेस सिलेक्‍शन बोर्डांच्या टेक्‍निकल ग्रॅज्युएटसाठी असलेल्या सैन्य दलातील लेफ्टनंट परीक्षा प्रक्रियेत सहभाग घेतला. सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डांच्या (एसएसबी) देशपातळीवर लेफ्टनंट पदासाठी परीक्षा प्रक्रिया घेतली जाते.


चैतन्यचे पदवी परीक्षेचे गुण चांगले असल्याने तो मुलाखत प्रक्रियेत निवडला गेला. अगदी दोन्ही मुलाखतीचे टप्पे त्याने पार केले. तसेच शारीरिक चाचण्यामध्येही त्याने चांगली कामगिरी केली. तसेच वैद्यकीय तपासणीतही त्याने उच्चस्तरीय चाचण्याचे आव्हान पेलले. इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून लेफ्टनंट पदाच्या देहरादून येथे भारतीय सैन्य अकादमीत होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवडला गेलेला तो देशातील एकमेव तरुण आहे. यासाठी आई-वडील व मेजर मोहित शर्मा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले. सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डाद्वारे लष्करात भरती होणारा चैतन्य हा यावेळचा भारतातील एकमेव तरूण असून येथील एसबीआय बॅंकेचे उपव्यवस्थापक अनंत दिवाणजी यांचा तो सुपुत्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!