मोठी बातमी ! चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या संदर्भात बैठक लावण्याचे निर्देश;बाळासाहेब मोरे यांच्या प्रयत्नाला यश
मुंबई; दि.१८ : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे हे आपल्या शिष्टमंडळासह गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे आहेत.काल
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची समक्ष भेट घेऊन बाळासाहेब मोरे यांनी बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा,यासंदर्भात बैठक लावण्याविषयी विनंती केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक लावण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती बाळासाहेब मोरे यांनी दिली आहे.बाळासाहेब मोरे यांच्या समवेत कुरनुरचे माजी उपसरपंच लक्ष्मण बेडगे, चपळगावचे पत्रकार शंभुलिंग अकतनाळ,ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थित होते.
बाधित शेतकऱ्यांना आता न्याय निश्चितपणे मिळेल असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलने झाली यामध्ये सहकार्य केलेल्या सर्वपक्षीय नेतेमंडळींचे मी मनापासून आभार मानतो अशी भावना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली आहे.