‘आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘’माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या घोषणेची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांना उत्तर देत होते. मात्र त्यावेळी जाहिरातीचा विषय निघाला. त्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या घोषणेची आठवण करून देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ते जाहिरातीचे जाऊद्या. आधी फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एवढीच घोषणा होती. मात्र, आमचे ब्रीद वेगळे आहे, माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचे ब्रीद आहे. आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी माविआ आणि उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला.