मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ “या” मतदार संघातुन निवडणुक लढणार, भाजपकडुन १०५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवार असतील, अशी घोषणा उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केली.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति की बैठक में उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव-2022 के लिए निम्नलिखित प्रत्याशियों के नामों पर अपनी स्वीकृति दी गई है। (1/2) pic.twitter.com/sFcQQZfiMp
— BJP (@BJP4India) January 15, 2022
योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणुक लढणार अशी चर्चा मागील काहि दिवसांपसुन सुरु होती. उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घोषणेनंतर या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले कि, , “भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत दोन प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर येथून तर केशवप्रसाद मौर्य प्रयागराज जिल्हातून उमेदवार असतील” अस त्यांनी सांगीतले. ४०३ जागांच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप ३०० हून अधिक ठिकाणी यश मिळवेल, असा विश्वासही उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.