अक्कलकोट, दि.26 : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या हन्नूर ते चुंगी रस्त्यावरील पाटील वस्त्याच्या रस्त्याचे खडीकरण काम पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत असून, लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे. चुंगी पाटील वस्ती हा रस्ता गेल्या 25 वर्षापासून ग्रामीण रस्ते विकास मार्ग 72 क्रमांक विकसीत न झाल्याने पाटील वस्तीतील रहिवाश्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. जाणून-बूजून रस्ता न करण्याचे कारस्तान केल्याने 500 जन संख्या वस्ती असलेल्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.
चुंगी गावचे सरपंच सारिकाताई राजभाऊ चव्हाण, उपसरपंच महादेव माने, पोलीस पाटील संतोष पाटील, तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर चव्हाण, व प्रहारचे प्रवक्ते विजय तथा गोटू माने व राजू चव्हाण यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेऊन व्यथा मांडली असता याबाबत आमदार कल्याणशेट्टी यांनी त्वरीत दखल घेऊन एका दिवसात मंजूरी व लगेच कामाला सुरूवात आणि काम पूर्ण करून दिले आहेत.
आगामी काळात सदरचा रस्ता हा डांबरीकरण करून देण्याची ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले आहेत. या कामी हन्नूर गावचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.सदरचा रस्ता खडीकरण झाल्याने शासनाच्या रस्ते विकास आराखड्यात चुंगी पाटील वस्तीचे नाव आल्याने वस्तीतील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
याबरोबरच आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी रा.प.म. बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक असून या कामी प्रहार अक्कलकोट शहर अध्यक्ष अमर शिरसट यांनी प्रयत्न केले आहेत. या पाटील वस्तीच्या रस्त्यामुळे अंपग, दिव्यांग, शाळेचे विद्यार्थी, वैदकिय सेवा, शेतकरी यांच्या करिता सुलभ ठरणार आहे.
खडीकरण झाले, लवकरात लवकर डांबरीकरण करण्या कामी प्रशासनाने पाऊले उचलावीत अशी मागणी प्रहार प्रवक्ते विजय तथा गोटू माने यांनी केली आहे.
या कामासाठी राजाभाऊ चव्हाण, अप्पी पाटील, शशिकांत फडतरे, औदुंबर जमादार, महादेव फडतरे, हरिदास सावंत, भीम फडतरे, शिवाजी फडतरे, संतोष मिरगिरे, सोपान सावंत, नेताजी सुरवसे, नाना काजळे, पांडुरंग रेड्डी, श्रीमंत फडतरे, परमेश्वर कोराळे, विकास घायाळे, गौरीशंकर कोळी यांचे सहकार्य लाभले आहे.