जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी
दिल्ली : रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छात्र संघाच्या कार्यालयात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यात डाव्या संघटनांनी शिवाजी महाराज यांच्या फोटोवरील हार काढून फोटो फेकून दिल्याच्या आरोप एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
जेएनयु अभविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, ‘आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून विद्यार्थी क्रियाकलाप केंद्राच्या बाहेर भिंतींवर शिवाजी महाराजांचे चित्र लावले होते. पण जेएनयुचे कम्युनिस्ट हे पचवू शकले नाहीत. येथे ‘१०० फ्लॉवर्स ग्रुप’ आणि एसएफआयचे लोक आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केली.
मात्र, डाव्या संघटनांनी या बाबत नकार दिला आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार आयआयटी मुंबई येथे एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी त्या मुलाला न्याय मिळावा या साठी रॅली काढण्यात आली होती. मात्र, या दरम्यान एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या रॅलीवर हल्ला केला असा आरोप डाव्या संघटनांनी केले आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आणि दोन्ही गटातील विद्यार्थ्यंना शांत केले.