मुंबई : उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात महाराष्ट्रात कमकुवत होत असल्याने आगामी पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदा थंडीचा कालावधी कमी असला, तरी मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांत जाणवलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर 5 दिवसांत (सोमवारपर्यंत) राज्यातून थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पहाटेच्या सरासरी किमान तापमानात हळूहळू सुमारे 2-3 अंशांनी वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्यास सुरुवात होईल. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच उबदारपणा जाणवतच होता, तो तसाच अजून पुढील 5 दिवस टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.