ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशभरातील व्यापाऱ्यांचा उद्या भारतबंद; ‘ही’ आहे मागणी

नवी दिल्ली : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) या देशभरातील व्यापारी संघटनेनेजीएसटीच्या नियमांच्या समीक्षा करणे तसेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी उद्या शुक्रवारी ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. उद्या देशभरातील बाजार बंद राहणार आहेत. देशातील सर्व राज्यांतील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी ‘व्यापार बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचा असा दावा ‘कॅट’कडून करण्यात आला आहे.

‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरातील दीड हजार ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांकडून ‘जीएसटी पोर्टल’वर लॉग इन न करता आपला विरोध दर्शविणार आहे. देशभरात व्यापाऱ्यांचा हा विरोध तर्कसंगत आणि शांतीपूर्ण पद्धतीने पार पडेल. होलसेल आणि रिटेल बाजारही पूर्णत: बंद राहतील. परंतु, अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकानं मात्र या बंदमधून वगळण्यात येतील, असंही ‘कॅट’कडून स्पष्ट करण्यात आलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!