ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘भारतजोडो’ यात्रेतील सहभागासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ही येत्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी तर शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली.

या शिष्टमंडळात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, विश्वजित कदम, नसीम खान यांचा समावेश होता. दरम्यान त्यापूर्वी ‘भारत जोडो’ यात्रेच्या टायरीच्या संदर्भात एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. आजही कॉँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकी राज्यातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!