तेजपूर : देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहू लागले आहे. आसाम विधानसभेची देखील निवडणूक असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आज प्रियांका गांधी यांनी सधारु टी स्टेट या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली. तेजपूर येथे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुराच्या घरी जाऊन जेवण केले. प्रियांका गांधी यांनी चर्चा करत विचारपूस केली. मजुराच्या लहान बालकाला प्रियांका गांधीनी हातात घेऊन खेळवले.
Assam: Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra has a meal at the residence of a local tea garden worker, in Tezpur. pic.twitter.com/FXaQKI53vH
— ANI (@ANI) March 2, 2021
आसाम निवडणुकीत चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात. आसाममध्ये १२६ सदस्यांची विधानसभा असून येथे २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
Smt. @priyankagandhi joins tea workers at Sadhuru tea garden and tries her hand at plucking tea leaves. pic.twitter.com/3qFtbGkESF
— Congress (@INCIndia) March 2, 2021