पश्चिम बंगालमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, सर्व राजकीय सभा केल्या रद्द !
नवी दिल्ली -दिवसेंदिवस देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे पश्चिम बंगाल मधील सर्व राजकीय सभा त्यांनी रद्द केल्या आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दररोज 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे.अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय सभा रद्द केल्या असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांनाही राजकीय सभा न घेण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाचे संकट पाहता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सभांमधून जनता आणि देशाला किती धोका आहे, याचा राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. आपण जरी या सहभाग घेत असलो तरी या सभेमधून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने जनतेच्या जीवाशी खेळ आहे त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.