मुंबई : मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व अमिन पटेल यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. या संदर्भात माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
अर्थिंक मंदी,वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना @mybmc ने महापालिकेच्या मालकीच्या रहिवासी इमारतीतील,बीआयटी चाळींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंच्या डोक्यावर भाडेवाढ लादण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो
बिनशर्त त्वरित रद्द करावा ही मागणी आज @CMOMaharashtra कडे केली pic.twitter.com/HPO0maHJbO— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 15, 2022
अंधेरी पोटनिवडणुकीपुर्वी काँग्रेस नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, मतदार संघातील विकास कामांबाबत त्यांची भेट घेऊन चर्चा केली, यातून राजकीय अर्थ काढू नये, असे तिघांनीही सांगितले.