ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुळे २ जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली, नवी तारीख लवकरच घोषित होणार

मुंबई : येत्या २ जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलंय की, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे.

अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे. MPSC ने एका पत्राद्वारे हे स्पष्ट केलं आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार असून रविवारी दोन जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!