नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. देशात महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज पाच हजारापेक्षा अधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात होत आहे. खबरदारी म्हणून संचारबंदीसह शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार बंदच निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. दिल्लीत जाणार्या लोकांना कोरोना टेस्ट करुन रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, केरळ, पंजाब या राज्यातून दिल्लीत येणार्या लोकांना कोरोना टेस्ट करणे आवश्यक करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.
काल रिकव्हरीपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रात 6,218 संक्रमित आढळले. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती जिल्ह्यात रुग्ण अधिक आढळत आहेत.