ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कृषी उत्पन्न बाजार समितीत ३५४ जणांची कोरोना चाचणी; सर्व अहवाल निगेटिव्ह

दुधनी : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या आणि श्री शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश शंकरराव म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल, तोलार, शेतकरी व व्यापारी असे मिळून एकूण ३५४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस.एस. स्वामी यांनी दिली आहे.

दुधनी शहर आडत व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकूण १०० आडत दुकाने आहेत. दुधनी शहर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर वसलेल शहर आहे. यामुळे आडत्यांमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतातील धान्य विक्रीसाठी आणतात. व्यापार वहिवाट करताना व्यापारी आणि शेतकरी थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. एकमेकांपासुन कोरोनाचा संसर्ग होऊ नये, या पार्श्वभुमीवर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका आरोग्य विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना चाचणी घेण्यात आली. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आली आहेत. यामुळे येथील व्यापारी आणि बाजार समितीत समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, रेवणसिद्ध पाटील, बसवराज परमशेट्टी, सचिव एस.एस. स्वामी, एम. सी.कोंपा, चंद्रकांत कामजे, रतीश कोटनूर, नगर परिषद कर्मचारी शांतलिंग चिंचोळी, यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!