ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुळे देशात दररोज ५ हजारापेक्षा जास्त मृत्यू होणार; वॉशिंग्टन विद्यापीठाने दिली पत्रकारांना माहिती

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनामुळे
देश मोठ्या अडचणीतआहे. येत्या काही दिवसांत हे संकट अधिक तीव्र होणार आहे. भारतातील कोरोना मृतांचा आकडा मे च्या मध्यावधीपर्यंत ५ हजारच्यावर पोहोचू शकतो, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने दिला आहे.याचा अर्थ असा होतो की केवळ एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान देशात कोरोनामुळे सुमारे तीन लाख लोक आपला जीव गमावू शकतात.

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने (आयएचएमई) ‘कोव्हिड प्रोजेक्शन्स’ या नावाने तयार केलेल्या अभ्यास अहवालातून भारतात कोरोना मृतांचा आकडा मोठ्या संख्येने असल्याचा इशारा दिला आहे. हा अहवाल भारतासाठी नक्कीच चिंता वाढवणारा आहे,असे ही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!