प्रयागराज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसंख्येच्या असमतोलावर त्यांनी भाष्य केले आहेत. धर्मांतर आणि घुसखोरी ही लोकसंख्या असमतोलाची कारणे आहेत असे संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे यांनी म्हंटले आहेत. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी आणि धर्मांतर ही देशातील लोकसंख्या असमतोलाची कारणे आहेत. हे रोखायचं असेल तर धर्मांतर विरोधी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी होसबाळे यांनी केले आहेत.
देश में सब पर लागू होने वाली जनसंख्या नीति बननी चाहिए – दत्तात्रेय होसबाले जीhttps://t.co/leAXtpYwM5
— RSS (@RSSorg) October 19, 2022
होसबाळे म्हणाले की, घरवापसीचे चांगले परिणाम समोर आले आहेत. घर वापसी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकालेल्या नागरिकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासठी घर वापसी राबवण्यात येत आहे. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. उत्तरप्रदेश आणि इतर काही राज्यात कोणत्याही आमिषाने किंवा बळजबरीने धर्मांतर करण्यास मनाई आहे. तसेत आरक्षणासाठी धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासून भूमिका आहे असे होसबाळे म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीची चार दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना होसबाळे म्हणाले की, आपल्या देशात धर्मांतरामुळे अनेक भागात हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. त्याचे परिणामही भोगावे लागत आहेत. याआधीही हे झालं असून त्याच्या समस्या जाणवल्या आहेत. धर्मांतराबाबत जनजागृती करायचं काम संघाकडून करण्यात येतं. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.